अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. सामनासाठी घेतलेल्या या मुलाखतीचा प्रसिद्ध करण्यात आला आहे,
या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर घणाघात केला आहे. तसेच अनेक ध्येयधोरणे स्पष्ट केले आहेत.
मुलाखतीच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना काही गमतीदार प्रश्न विचारले आणि त्याची भन्नाट उत्तरेही त्यांनी दिली.
तुमच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही, फक्त थोडे डोक्यावरचे केस तेवढे गेलेले दिसताहेत, हा सहा महिन्यांतला परिणाम आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझा चेहरा स्वच्छच आहे, फेसबुकलाईव्हमध्ये सुद्धा माझा फेस हा स्वच्छच होता. फेसबुकच्या माध्यमातून मी जनतेशी संवाद साधला,
त्याला काहीही म्हटलं तरी मी जनतेशी असलेले माझं नातं तुटू दिलं नाही, जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही. त्यांच्यासोबत मी म्हणजे महाराष्ट्र सरकार त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटात,
प्रत्येक पावलांवर त्यांच्यासोबत आहे. केस कमी झालेले दिसताहेत, त्याचं कारणही सांगतो, एकतर बऱ्याच दिवसानंतर कालच मी केस कापलेत, गेले तीन-चार महिने स्वत:च स्वत:चे केस थोडेफार कमी करत होतो असं भन्नाट उत्तर त्यांनी दिलं.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com