धक्कादायक : असा झाला रेखा जरे पाटील यांचा खून,तलवारीने गळा …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून झाला असल्याची माहिती मिळाली आहे. 

नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्यावर नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हल्ला झाला. यातच त्या मृत्यूमुखी पडल्या. 

सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. जरे या पुण्याकडून त्यांच्या सॅन्ट्रो कारमधून नगरकडे येत होत्या. त्यांच्यासमवेत त्यांची आई, मुलगा तसेच एक महिला होती. 

जातेगांव घाट चढून आल्यावर जरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. तलवारीने त्यांच्या गळा चिरण्यात आला असून त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान सामाजिक आणि महिलांसाठी सातत्याने कार्यरत असणार्‍या जरे यांच्या खुणामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24