Tourist Place In Kolhapur:- महाराष्ट्राचा विचार केला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. भव्यदिव्य अशा सह्याद्रीच्या डोंगररांगा, त्या डोंगर रांगांमधून खळाळुन वाहत असलेले धबधबे तसेच नद्या नाले आणि एवढेच नाही तर राज्याच्या उत्तरेला असलेला सातपुडा सारख्या डोंगररांगा व त्या ठिकाणी असलेली पर्यटन स्थळे इत्यादी चा उल्लेख आपल्याला यामध्ये करता येईल.
त्यातल्या त्यात जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पर्यटन स्थळांची रेलचेल आपल्याला दिसून येते. अनेक गड किल्ले सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये आपल्याला दिसून येतात.
यामध्ये जर आपण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे पर्यटन स्थळ आपल्याला दिसून येतात. खासकरून कोल्हापूरमधील खवय्यांसाठी महत्त्वाचा असलेला
तांबडा पांढरा रस्सा आणि त्या ठिकाणी मिळणारे झणझणीत असे मिसळ आपल्या डोळ्यासमोर पटकन येते. या दृष्टिकोनातून आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील किंवा कोल्हापूर शहरातील पाहण्यासारखी पर्यटन स्थळांची माहिती या लेखामध्ये घेऊ.
कोल्हापूर शहर व आजूबाजूची पर्यटन स्थळे
1- कोल्हापूरचे श्री.अंबाबाई मंदिर- कोल्हापूर जिल्ह्यात किंवा कोल्हापूर शहरात किंवा कोल्हापूर जवळ येऊन कोणी व्यक्ती अंबाबाई चरणी लीन होणार नाही असं होऊ शकत नाही.
कोल्हापूर या शहरांमध्ये असलेले अंबाबाई मंदिर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक आकर्षण आणि सुंदर पर्यटन स्थळ म्हणून श्री. अंबाबाई मंदिर ओळखले जाते. अनेक भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे.
2- पन्हाळगड- जर आपण कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची यादी पाहिली तर यामध्ये पन्हाळगडाचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते.
हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून देखील प्रसिद्ध आहे. पन्हाळा किल्ला हा डोंगरावर वसलेला असून मुळातच थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या या किल्ल्याच्या ठिकाणी अनेक पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
3- कोल्हापूरचे वस्तुसंग्रहालय- कोल्हापूर शहराचा विचार केला तर या शहराला एक ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची उत्तम माहिती मिळेल
असे ठिकाण म्हणजे कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल म्युझियम म्हणजेच कोल्हापूर वस्तुसंग्रहालय होय. या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूरचा काही हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडू शकतील अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात.
4- रंकाळा तलाव– कोल्हापूरच्या प्रसिद्ध असलेल्या श्री.अंबाबाई मंदिराच्या अगदी जवळ रंकाळा तलाव असून पर्यटकांच्या आकर्षण असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाणांपैकी हे एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे.
5- विशाळगड– कोल्हापूर शहरापासून साधारणपणे 90 किलोमीटर अंतरावर हा ऐतिहासिक असा विशाळगड किल्ला असून तो शाहू गड या तालुक्यात आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विशाळगड किल्ला खूप महत्त्वपूर्ण असून या गडाच्या चोहोबाजूनी असलेले मोठमोठे खंदक पाहण्यासारखे आहेत.
6- प्रसिद्ध ज्योतिबा मंदिर- ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असून ते साधारणपणे कोल्हापूर शहराच्या 15 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग असून जवळच यमाई मंदिर आहे. महाराष्ट्र बाहेरील देखील अनेक भक्तगण या ज्योतिबा मंदिराला आवर्जून दर्शनाकरिता भेट देतात.