अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-ती संघटना आहे की पक्ष आहे, मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे, असा खरमरीत टोला शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला लगावला.
मनसेने शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतली जात आहे,
असा गंभीर आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केला होता. फेरीवाले बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतात. बाळासाहेबांचे फोटो लावून हे कृत्य करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देताना ही तर टाईमपास टोळी आहे, असे म्हटले आहे. तर शिवसेनेच्या शाखेकडून १० रुपये वसूल केले जात आहेत. यात नगरसेवकांचा फोटो आहे पण बाळासाहेबांचा फोटोही आहे.
शिवसेनेला बाळासाहेबांचा फोटो अशाप्रकारे खंडणी वसूल करण्यासाठी वापरण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांना यातला कट पोहोचतोय का? असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला होता.