वधूवर पित्याकडून ‘उरकून’ घेण्याचा सपाटा …असे होत आहेत लग्नसोहळे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू करण्यात आल्यामुळे वधूवरांच्या लग्न सोहळ्याचे देखील गणित बिघडून गेले असे असले तरी लॉकडाऊनच्या काळातही वधूवर पित्याकडून लग्नसोहळे उरकून घेण्याचा सपाटा सुरूच राहिला असून, एरवी दुपारच्या दोन तीन वाजता लागणारे लग्न लॉकडाऊनमुळे सकाळी साडेआठलाच लागून नऊ वाजता नवरी सासरच्या रस्त्याने मार्गस्त होत आहेत.

त्यामुळे सध्या लग्नाचा मुहूर्त साडेआठचाच माणून करंजी परिसरातत पाच लग्न सोहळे सोशल डिस्टन्स राखत पार पडले आहेत. कोरोना संसर्गामुळे दोन महिन्यापासून संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे.

याचा परिणाम वधूवरांच्या लग्न सोहळ्यावर देखील झाला असून मोठ्या थाटामाटात पार पडणारे लग्नसोहळे अवघ्या दहा वीस लोकांच्या उपस्थितीतच कुठेतरी वस्तीवर आडबाजूला संपन्न होत आहेत. सकाळी पोलिस यंत्रणा सज्ज होण्याच्या आतच साडेआठ नऊ वाजताच ग्रामीण भागात लग्नसोहळे उरकून घेण्याचा सपाटा सुरू आहे.

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे चार लग्नसोहळे सकाळी साडेआठ वाजण्याच्या आतच उरकून घेतल्याची गावात चर्चा आहे. तर जवळच असलेल्या खंडोबावाडी येथे एक लग्न सोहळा सकाळी साडेदहा वाजता पार पडला. मात्र या लग्नसोहळ्याची खबरबात प्रशासनाला समजली आणि वधूवर मंडळीला पाच हजार रुपये दंड भरावा लागला.

त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सकाळी साडेआठचा मुहूर्तच बरा असेच म्हणण्याची वेळ वधूवर पित्यांवर येवून ठेपली आहे. असे असले तरी या शॉटकट लग्नसोहळ्यामुळे बॅन्डवाले, फर्निचर, मंडप लाईट डेकोरेशन आदी व्याावसायिकांना मात्र या काळात डोक्याला हात लावून घेण्याची वेळ आली आहे. कोरानामुळे त्यांच्या पुर्ण व्यवसायावरच पाणी फिरले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24