अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : ओझर येथे भोसले यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेऊन बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर सडकून टीका केली.
आता शिवसेनेचं हिदुत्व कुठं दिसतंय, असा सवाल त्यांनी केला. भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबन मुठे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, आकाश त्रिपाठी, भिखचंद मुठे यावेळी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, इंदोरीकर महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खेड्यापाड्यांत पोहोचवली. त्यांनी कीर्तनात ग्रंथाच्या आधारे वक्तव्य केले.
इंदोरीकर महाराजांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा होता. काही मूठभर लोकांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. महाराष्ट्रातील आध्यात्मातील सर्व मंडळी महाराजांच्या पाठीशी आहे, असे भोसले म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews