मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी या नेत्याची लागली वर्णी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

अध्यक्षपदी भाई जगताप तर चरणसिंह सपरा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रक काढत याबाबतची घोषणा केली आहे.

विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले.

भाई जगताप यांच्या रुपाने काँग्रेसला मिळाला मराठी चेहरा भाई जगताप हे रस्त्यावरील आंदोलनांपासून ते टीव्ही डिबेटपर्यंत काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडत असतात.

मुंबई काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आणि युवा नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. भाई जगताप यांच्या रुपाने काँग्रेसला मराठी चेहरा मिळाला आहे. तसंच पक्ष संघटनेत प्रदीर्घ अनुभव असणे ही भाई जगताप यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगितले जाते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24