अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरू होती. मात्र, मुरकुटे यांनी या वृत्ताचा इन्कार केला.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी तालुक्यात स्वतंत्र लोकसेवा विकास आघाडीची स्थापना केली होती. काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या पाठीशी ते उभे राहिले होते.
हे पण वाचा :- महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या फ्लॅटवर जाऊन बलात्कार !
मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना साथ दिली. या पार्श्वभूमीवर या चर्चेला उधाण आले होते. तसे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
हे पण वाचा :- बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी नाकारली !
या वृत्ताची खात्री करण्यासाठी मुरकुटे यांच्याशी मोबाइलवर चर्चा केली असता आपण बँक व कारखान्याच्या कामासाठी शरद पवार यांना भेटलो असल्याचा खुलासा त्यांनी केला.
हे पण वाचा :- फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार
माजी आमदार दादा कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, हिंमत धुमाळ, लहू शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.