महाराष्ट्र

MSRTC News : एसटीची ही योजना गुंडाळली ! प्रवास भाड्यात सवलत मिळणार नाही ?

Published by
Ahmednagarlive24 Office

MSRTC News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली. मात्र, दीड वर्षापासून नवीन स्मार्ट कार्ड नोंदणी, नूतनीकरणाचे काम ठप्प झाले आहे.

एसटी महामंडळाने १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग आदींना स्मार्ट कार्ड दिले जात होते.

मात्र, एसटीची स्मार्ट कार्ड योजना पाहणाऱ्या कंत्राटदाराचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील सर्व आगारांतील स्मार्ट कार्डची कामे ठप्प झाली आहेत.

मात्र, ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड, शासकीय ओळखपत्र दाखवून तिकीट दरात सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

१ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली. मात्र, कोरोनाची लाट आल्यामुळे व एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही सेवा दीड वर्ष बंद होती.

संप मिटल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, सध्या तरी एसटी बसमध्ये स्मार्ट कार्ड सेवा ठप्प आहे.

त्यामुळे ही योजना गुंडाळली असल्याचे चित्र आहे. सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंद असेल तर सरकारी कार्ड दाखवून सवलत मिळत आहे.

स्मार्ट कार्ड नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. एसटीमध्ये विविध घटकांना तिकीट दरात सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले होते.

दरम्यान, स्वारगेट आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी म्हणाले की, एसटी महामंडळाकडून सध्या स्मार्ट कार्ड सेवा बंद असल्याने इतर सरकारी कागदपत्रे दाखवली तरी सेवा सवलत दिली जात आहे. यामुळे स्मार्ट कार्ड असले पाहिजे, असे बंधनकारक नाही.

नूतनीकरणाचे काम बंद : शासकीय ओळखपत्र असेल तरच तिकीट दरात सवलती

एसटीतर्फे तिकीट दरात कोणाला किती सवलत ?
■ वय ७५ पेक्षा जास्त : १०० टक्के
■ स्वातंत्र्यसैनिक : १०० टक्के
■ पत्रकार : १०० टक्के
■ अपंग : ७५ टक्के
■ ज्येष्ठ: ५० टक्के
■ महिला : ५० टक्के

Ahmednagarlive24 Office