अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, दोन लाख रुपयापर्यंतचेच कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे, त्यामुळे दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेले शेतकरी या कर्जमाफीपासून वंचितच राहणार आहेत.
त्यामुळे सातबारा कोरा करण्याचे आश्वासन कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित करत राज्य शासनाची ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आठवले म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीत दोन्ही पक्षांचा समावेश आहे.
सत्तेवर आल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामुळे राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होणार नाहीत. त्यामुळे ही कर्जमाफी तशी फसवीच आहे, असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल, तर त्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने तसा निर्णय घ्यावा, असे आवाहनही केंद्रीय मंत्री आठवले यांनी यावेळी केले.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात….
हे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले ….
हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग :- चाकूने भोसकून तरुणाचा खून