अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- जानेवारीपर्यंत भिंगारचे नागरिक मोकळ्या रस्त्याने जाऊ शकतील यासाठी भिंगार अर्बन बँक ते वेशी पर्यंतचा रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रुंदीकरण व डांबरीकरणाचा प्रश्न सोडवणार आहे.
छावणी परिषदेमुळे भिंगारचा विकास खुंटला आहे. छावणी परिषदेचा उपयोग काय. म्हणून छावणी परिषदेचा कायदा रद्द झाला पाहिजे.
यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनाच नगरला आणल्याशिवाय संरक्षण खात्याकडे असलेले प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
भिंगार शहर भाजपच्या वतीने छावणी परिषदेच्या माध्यमातून सर्वे करून निवडण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या २० लाभार्थीं पथविक्रेत्यांना शिफारसपात्रांचे वाटप पथविक्रेत्यांना शिफारसपात्रांचे खासदार सुजय विखे, माजी खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते भिंगार छावणी परिषदेच्या कार्यालयात करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते . मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, उपाध्यक्ष प्रकाश फुलारी, भिंगार भाजप मंडल अध्यक्ष वसंत राठोड,
नगरसेविका शुभांगी साठे, संजय छजलानी, रवींद्र लालबोंद्रे, भाजप उपाध्यक्ष शिवाजी दहीहंडे,सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, गणेश साठे आदी उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गांधी यांनी पाइपलाइनसाठी निधी मंजूर केला आहे.त्याच्या पूर्ततेसाठी मी पाठपुरावा करत हाही प्रश्न जानेवारीपर्यंत सुटून एमआयडीसी मधून
भिंगारसाठी स्वतंत्र पाइपलाइन केली जाईल. भिंगार मधील पोलिस स्टेशनची जागा चुकीची आहे. त्याचे स्थलांतरासाठी नव्या पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved