तीन महिन्यात येणार ‘ही’ लस ; आधी ‘ह्या’ लोकांना देणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- कोरोनावर जगभर संशोधन सुरू आहे. त्यात प्रगतीही होत आहे. काही महिन्यांमध्ये लस येऊ शकते. असा दावाही केला जात आहे. परंतु अद्याप रशिया वगळता कोणत्या देशाने लस अजूनही आणली नाहीये.

परंतु आता एक दिलासादायक वृत्त आहे. ऑक्सफर्डची लस आघाडीवर आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये ही लस तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2021 पूर्वीच या लशीला सरकारची मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लहान मुलांना वगळून पहिले जास्त धोका असलेल्या ज्येष्ठांना ही लस द्यायची का यावरही विचार सुरू आहे.

पहिल्या सहा महिन्यात सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्याची योजना असून त्यासाठी लष्कराचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधल्या ‘टाईम्स’ या वृत्तपत्राने वैज्ञानिकांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

दरम्यान सिरम इन्स्टिट्यूट कोव्हिड-19 च्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी देशभरात सुरू आहे. सोबतच सिरम इन्स्टिट्यूट अधिकचे 10 कोटी डोसेस तयार करणार आहे.

काही दिवसांपूर्वी थांबवण्यात आलेली ट्रायल पुन्हा सुरू करायला DCGI ने सिरम इन्स्टिट्यूटला परवानगी दिली होती. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातली चाचणी भारतभरातल्या 17 शहरांमध्ये केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24