दुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  मागील वर्षी जिल्ह्यातील अनेक गाव तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी असल्याने त्या – त्या गावात पाण्याची टंचाई निर्माण होत असत.

तसेच सातत्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने या गावांना दुष्काळग्रस्त गाव संबोधले जात असत. मात्र अशाच दुष्काळावर मात्र करून आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण करण्याची किमया अकोले तालुक्यातील कुमशेत या गावाने केली आहे.

टँकरचे गाव हे ओसाड माळरान जमीन असलेले गाव म्हणून ज्याची ओळख नकाशावर होती, ती पुसून त्या नकाशावर पाणीदार व विकासाच्या वाटेवर चालणारे आदर्शवत गाव कुमशेत या गावाने आपली ओळख निर्माण केली आहे. नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात कुमशेत हे गाव वसले आहे.

जलसंधारणाच्या विविध कामांतून गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंकर बंद झाला आहे. शिवारात पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे. यामुळे एकेकाळी दुष्काळग्रस्त पाहिले जाणारे गाव आज हिरवळीने नटले आहे. नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यापासून ५५ कि.मी.वर कुमशेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव आहे.

गावाच्या एका बाजूस धारेगाव कोकणकडा आहे. कुमशेत पाणीदार गाव म्हणून आपली ओळख निर्माण करू लागले आहे. उन्हाळ्यात पाणीप्रश्न नेहमीच गंभीर बनत यासाठी कुमशेत येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या सहकार्यातून दगडी बंधारे, लघू पाटबंधारे विभागाकडून पाच तर लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले.

त्यातून डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी अडविले. जलयुक्त अभियान कार्यक्रमातून पाणी अडवण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. बंधाऱ्यांमध्ये मे अखेरपर्यंत पाणी टिकते. त्याचा फायदा म्हणजे गावाला पिण्यासाठी पाणी मिळालेच. यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24