“हे ” चॅलेंज पडेल महागात पोलिसांचा सावधनतेचा इशारा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ट्रेंड आला. #couplechallenge हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र यामुळे काय धोका होऊ शकतो याची थोडीही जाणीव नाही.

यामुळे अशा ट्रेंडवाल्यांसाठी पोलीसांनी ट्विटरच्या माध्यमातून एक चांगलाच संदेश दिला आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांनो सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपल चॅलेंज होईल’.

त्यामुळे सोशल मीडियावर अशा ट्रेंडपासून सावधान राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आपल्या जोडीदारासोबत फोटो पोस्ट करताना दोन वेळा विचार करा.

गोड वाटणारं चॅलेंज काळजी नाही घेतली तर चुकीचं होऊ शकतं. ‘कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपल चॅलेंज होईल’.

फोटो पोस्ट करताना काय धोका आहे हेदेखील पोलिसांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. आपण पोस्ट केलेले फोटो मॉर्फिंग, पॉर्न तसंच इतर सायबर क्राइमसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे काळजी घ्या असं पोलिसांनी म्हटलं आहे. या ट्रेंड बरोबरच फॅमिली चॅलेंज, खाकी चॅलेंज, सिंगल चॅलेंज यासह अनेक चॅलेंंज चे ट्रेंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे अशा ट्रेंडमध्ये सहभागी होण्याआगोदर त्याचे दुष्परिणामही पहायला हवे. अन्यथा मोठा धोका होऊ शकतो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24