यामुळे आता दहावीचा निकालही लांबणीवर पडणार …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना लॉकडाऊनच्या आदेशात दहावीचा शेवट पेपर अडकला. पण त्यापूर्वी झालेल्या इतिहास आणि राज्यशास्त्र पेपरच्या जिल्ह्यात 67 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पोस्टाची सेवा बंद असल्याने तालुका पातळीवर गाठोड्यात बांधून आहेत.

या पेपरची तपासणी न झाल्याने आता निकालही लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने सुरूवातीला संचारबंदी लागू करण्यात आली. त्या काळातही दहावीची परीक्षा सुरूच होती. नंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा केली.

त्यापाठोपाठ शिक्षणंमत्री वर्षा गायकवाड यांनीही दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर 31 मार्चपर्यंत पुढं ढकलण्याची घोषणा केली. देशात लॉकडाऊन करत पंतप्रधान मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत त्याची मुदत वाढविली.

त्यामुळे शेवटचा पेपर होईल की नाही याबाबत सांशकता असतानाच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली,दहावीच्या इतिहास विषयाच्या पेपरच्या उत्तरपत्रिका या तपासणीसाठी अजूनही पोहच झालेल्या नाहीत. तालुकापातळीवरील परिक्षक यांच्या ताब्यात या उत्तरपत्रिकांचे गाठोडे पडून आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24