कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी होतेय यंदाची भाऊभीज ऑनलाईन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत आहे.

तरी यंदाच्या वर्षी देशात सर्वच सणउत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनेक नात्यात, मित्र मौत्रिणी तसेच शेजारी पाजारी यांच्यात दुरावा तयार झाला आहे.

आता तर थेट बहिण भाऊ यांच्या नात्यात व प्रेमातही कोरोनाने दुरावा निर्माण केला आहे. अनेक भावांनी आपल्या बहिणीसाठी आपली भाऊबीज ऑनलाईन पाठऊन भाऊबीज साजरी करण्याचे ठरविले आहे.

दिपावली प्रमाणेच भाऊबीज हा अतीशय उत्साहात साजरा होणारा सण आहे. भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील प्रेमळ आनंदाचा व एकमेकांना भेटण्याचा व भेटवस्तू देण्याचा वर्षभऱातील एक चांगला असा उपक्रम आहे.

दिवाळीचा सण देखील साध्या पद्धतीने साजरा होताना दिसत आहे. तसेच कोरोनामुळे भाऊबीजेच्या प्रेमातही आंतर पडले आहे. अनेक भावांनी बहिणासाठी ऑनलाईन भाऊबीज (भेट) पाठऊन यंदाचा सण साध्या पद्धतीने साजरा होत आहे.

कोरोनामुळे बहीणीला भावाकडे म्हणजेच आई वडीलांकडे माहेरी जाऊ का नको अशी शंका निर्माण होत आहे. कोरोनाची भीती अध्यापही लोकांच्या मनातून गेली नाही.

त्यामुळे यंदा भाऊबीजही कशी साजरी करावी या चिंतेत अनेक कुटुंब आहेत. यातूनच यंदाच्या वर्षी ऑनलाईन सण साजरा होताना दिसत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24