जिल्ह्यातील बहुचर्चित भगवान गडावरील यंदाचा दसरा मेळावा रद्द

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला कोरोनाचे संक्रमण पाहता यंदाच्या वर्षी सणउत्सवांवर अनेक बंधने आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यातील बहुचर्चित भगवान गडावरील दसरा मेळाव्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे.

कोरोनावर लस निघेपर्यंत गडाचे महाद्वार खुले होणार नसल्याची माहिती गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दिली. भगवानगडाची स्थापना होऊन ६९ वर्ष झाली.

तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गडाचे नाव भगवानगड ठेवले. दरम्यान अनेक वर्षांची सुरु असलेली दसरा मेळाव्याची भाविकांची परंपरा यंदाच्या वर्षी खंडित होत आहे.

याबाबत महंत शास्त्री म्हणाले, गडावर अनेक विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून एकही विद्यार्थी प्रवेशद्वाराबाहेर गेला नाही.

गडावरील एकाही व्यक्तीला बाबांच्या कृपेने रोगाची बाधा झाली नाही. भगवान गडावर दैनंदिन धार्मिक विधी नियमित सुरू असून भाविक महाद्वाराचे दर्शन घेऊन माघारी फिरतात.

कुणालाही प्रवेश दिला जात नाही. गर्दीचा अंदाज पाहता दसरा मेळावा भाविकांना त्रासदायक होऊ नये यासाठी रद्द केला आहे, असे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24