अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत, तरीही शैक्षणिक शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावला जात आहे. अशा शाळांची चौकशी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

काही शैक्षणिक संस्था, शाळा पालकांना फी भरण्याची सक्ती करत असल्याच्या तकारी शासनाकडे आल्या. त्यामुळे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियमानुसार शासनाने आदेश जारी केला आहे.

शैक्षणिक वर्ष २०१५-२० व २०१०-११ मधील देय, थकीत, वार्षिक फी एकदाच न घेता मासिक, टप्पाटप्प्याने जमा करण्याचा पर्याय वापरावा, असे सूचित करण्यात आले.

शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही व त्यावरचा खर्च कमी होणार असल्यास पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीमध्ये चर्चा करून योग्य प्रमाणात फी कमी करावी, असेही सांगण्यात आले.

पालकांना ऑनलाइन फी भरण्याचा पर्याय देण्यात यावा. बोर्डाच्या व सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24