अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- राहुरीचा डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी एकटे विखे काहीच करू शकत नाहीत.
चार वर्षांपूर्वी अखेरची घटका मोजणारा साखर कारखाना पुन्हा सुस्थितीत उभा राहिल्याने कार्यक्षेत्रातील ऊसाचा पुरवठा करून गळीत हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे,
एक टिपरू ऊस नसलेल्या मंडळीने डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याबाबत उठाठेव करू नये, असे प्रतिपादन खासदार डाॅ सुजय विखे यांनी केले.
डॉ तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा ६० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिपदन व ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.विखे म्हणाले ६० व्या गळीत हंगामात सहा लाख मेट्रीक टन ऊसाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
ऊस उत्पादक व कामगारांच्या मदतीने गळीत हंगाम यशस्वी करण्यात येईल. साखर कारखान्याची डिस्टलरी सुरू करून उत्पादित मालाचे लायसेन्स भाडेतत्त्वावर अथवा विकणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या मदतीने डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरळीत चालू झाला आहे. डिस्टलरी सुरू करण्याचा प्रस्ताव दिल्यास जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाईल.
डाॅ. तनपुरे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमास माजी चेअरमन उदयसिंह पाटील, तसेच ज्येष्ठ नेते अॅड सुभाष पाटील यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनला होता.
यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष उद्धव महाराज मंडलिक,कारखान्याचे पदाधिकारी, संचालक, कामगार उपस्थित होते.
१ नोव्हेंबरपासून डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात दैनंदिन ४२०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ६ लाख मेट्रीक टन ऊसाचे उद्दिष्ट पुर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे, असे डॉ. विखे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved