अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- संपुर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. तसेच कोरोनाला हद्दपार करण्यासाठीची लढाई जिल्ह्यात सुरु असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे.
दरम्यान शासनाच्या नियमांचे भंग केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे.
सध्या सणासुदीचा काळ आहे, तसेच यामुळे ठिकठिकाणी गर्दीचा वावर वाढला आहे. यावेळी नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
याच अनुषंगाने मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पालिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना जिल्हाधिकारी भोसले यांनी दिले आहेत.
यासह जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोव्हिड उपचार सेंटर, केअर सेंटर बंद झाली आहेत, त्या ठिकाणाची यंत्र सामुग्री सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद, महानगर पालिका, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग,
महसूल आणि विळद घाट येथील विखे पाटील हॉस्पिटलच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोव्हिड चाचण्यांची संख्या वाढविण्यासोबत दूध विक्रेते,
भाजीपाला विक्रेते यांच्या कोव्हिड चाचण्या करण्यात याव्यात. कोरोना चाचणीची संख्या न वाढविणार्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved