अहमदनगर Live24 / राहुरी :- रेड ऑरेंज झोनमधील भागात लॉकडाऊन कमी झालेले नसून काही भागात पेट्रोल, किराणा, कृषी सेवा केंद्र, यांचा कालावधी मर्यादित असून कृषीक्षेत्राशी निगडित असणारी ठिबक, अवजारे, यांची दुकाने शासकीय निकषाप्रमाणे सुरू करणार असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत पत्रकार परिषदेत दिली.
सध्या लॉकडाऊन संपलेले नसले तरी कोरोनाची लढाई कायम असून नागरिकांनी आपली काळजी घेत नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन ना. तनपुरे यांनी केले.
ना. तनपुरे यांनी काल राहुरी तहसील कार्यालयात विविध विभागांतर्गत सुरू असणार्या कामांचा आढावा घेतला. कृषीविभागासह जलसंपदा, महसूल, आरोग्य, नगरपालिका, कायदा व सुव्यवस्था आदी विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आढावा झाल्यानंतर ना.तनपुरे पत्रकार परिषदेत म्हणाले, दि.20 एप्रिलनंतर काही भागात लॉकडाऊनला ढिल देण्याचे संकेत होते. सध्या कृषीक्षेत्राशी निगडित दुकाने सुरू करण्यावर भर देण्यात आलाआहे.
राहुरी शहरात किराणा,पेट्रोल दुपारी बारा वाजेपर्यंत उपलब्ध राहील, तालुक्यात कोरोनाबाधित रूग्ण आढळला नसला तरी नियमांचे पालन करीत पुढील काळात वाटचाल करायची असल्याचे ते म्हणाले.
आपल्या आमदार निधीतून तालुक्यात एन-90 मास्क 1हजार कीट उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनरेगाची कामे सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®