अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ला उडवण्याची धमकी दुबईहून मोस्ट वॉन्टेंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने फोनवरून दिल्याची माहिती आहे.
या धमकीनंतर ‘मातोश्री’ची सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन आले आणि मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून याप्रकरणी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांना पुढील सूचना दिल्या आहेत.
कुविख्यात,दाऊद इब्राहिमवर मुंबईतील 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 350 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
तसेच 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. मात्र पुन्हा त्याच्याच हस्तकाने ‘मातोश्री’ उडवून देण्याच्या धमकीने खळबळ उडाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved