अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-‘जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवली आहे. शरद पवार यांच्या विचारांचा हा पक्ष आहे.
त्यामुळे एकजुटीने पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागा.’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत केले.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा यात्रा शुक्रवारी नवव्या दिवशी यवतमाळमध्ये पोहचली असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली होती.
या वेळी जयंत पाटील म्हणाले, ‘मला रॅलींची अपेक्षा नाही. मी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून हा पक्ष बांधायचा आहे. जे खरं आहे ते स्वीकारले पाहिजे.’