जितेंद्र आव्हाड यांना धमकी…ते म्हणतात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई /प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड नेहमीच विविध गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांना ट्विटरवर एका युजरकडून धमकी देण्यात आली आहे.

यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून म्हटले होते की, भिडे गुरुजी आणि मंडळी वाट बघत आहेत तुमची.

त्यामुळे घराच्या बाहेर पडू नका, असे म्हटले होते. आता ते फारच संतापले असून आव्हाड यांनी याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा प्रकार गंभीर नाही का? याची दखल कोण घेणार? ही थेट जीवे मारण्याची धमकी आहे. मला आशा आहे की, संबंधित यंत्रणा याची दखल घेतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी एका व्यक्तीला बंगल्यावर बोलावून मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते.

आव्हाड यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.आणि आता या नवीन प्रकरणामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24