अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराबाबतची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
मात्र, आता त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांना जीवे मारण्याच्या धमक्या विविध फोन क्रमांकांवरून येत असल्याचा आरोप वकील त्रिपाठी यांनी केला आहे.
शुक्रवार, १५ रोजी त्रिपाठी यांनी घाटकोपर येथे पत्रकार परिषद घेऊ न ही माहिती दिली. त्रिपाठी म्हणाले, मला गुरुवार १४ रोजी सायंकाळपासून धमक्या येत आहेत.
याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र मेल करून तक्रार केली आहे. माझ्या अशिलावर हॅनीट्रॅपचे आरोप केले जात आहेत, त्याबाबत माझी अशिलाशी चर्चा झालेली नाही.
त्या स्वत: शुक्रवारी पत्रकार परिषदेला येणार होत्या आणि याचे उत्तर देणार होत्या. मात्र, त्या येऊ शकल्या नाहीत. त्यांच्यावर लावलेले हे आरोप खोटे असून, त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जेणेकरून माझ्या अशिलाला या प्रकरणात एफआयआर करता येऊ नये. याबाबत सविस्तर उत्तर माझे अशील माध्यमांना देणार आहेत.
समोरील व्यक्ती मोठी असल्याने त्यांना धमक्या दिल्या जात असल्याने माझ्या अशिलाने आतापर्यंत तक्रार केली नव्हती. मात्र, आता त्यांची भीती दूर झाल्याने त्यांनी तक्रार केली आहे. मला ही केस सोडून देण्यास धमक्या देण्यात येत आहेत. शिव्या देत आहेत