अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी , लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. नुकतीच जिल्ह्यातील एका कारखान्यात चोरट्यांकडून सव्वा तीन लाखांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
श्रीगोेंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील साईकृपा शुगर अॅड अलाईड इंडस्ट्रियल लिमीटेडमध्ये चोरी झाली आहे. घटनेत कारखान्याच्या ट्रान्सफॉर्मरमधील 3 लाख 25 हजार रूपयांचे ऑईल चोरीस गेले आहे.
याबाबतची फिर्याद अनिल नारायण पाचपुते (वय 46, धंदा नोकरी, सुरक्षा अधिकारी, साईकृपा शुगर अॅड अलाईड इंडस्ट्रियल लि., रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) यांनी दिली.
मंगळवार दि. 13 ऑक्टोबरला अज्ञात चोरट्याने हिरडगाव फाटा येथील साईकृपा शुगर अॅड अलाईड इंडस्ट्रियलच्या पॉवर हाऊसचे तीन ट्रान्सफॉर्मरमधील साधारण 6 हजार 500 लिटर ऑईल चोरी करून नेले.
अनिल पाचपुते यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. झुंजार करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved