खंडणीसाठी दोघांचे अपहरण करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी सध्या पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. दरदिवशी चोरी, लुटमारी, खंडणी वसुली आदी घटनांमध्ये वाढ होत आहे.

खंडणीसाठी दोघांचे अपहरण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक करत या घटनांना लगाम लावण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

नगर औरंगाबाद रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारातील हॉटेलमधून शेतकर्‍यासह वाहनचालकाचे खंडणीसाठी अपहरण करणार्‍या आरोपींपैकी तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करत अपहरण झालेल्या दोघांची सुटका केली आहे.

खोसपुरी शिवारात अपहरणाची घटना घडली होती. महेश होळकर (वय- 23 रा. कडा ता. आष्टी जि. बीड), रवी रमेश बायकर (वय- 25 रा. पुंडी जि. बीड) व

अमोल आप्पासाहेब शेळके (रा. ब्राह्मणी ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे असून एक जण पसार आहे. नेमके काय घडले होते

जाणून घ्या गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील भगवान धनसिंह शिहरे या शेतकर्‍याला आरोपींनी फोन करून तुमच्याकडील कांदा बियाणे खरेदी करायचे असल्याचे सांगत फसवून त्याचे अपहरण केले होते.

यावेळी आरोपींनी अपहरणकर्त्यांच्या कुटुंबीयांकडे आठ लाखांची मागणी केली होती. दरम्यान या घटनेबाबत अंगद शिहरे यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती देत आरोपींविरूद्ध फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध घेतला. त्यानंतर कडा व ब्राह्मणी येथे दोन पथके पाठवून अपहरण झालेल्या दोघांची सुटका करत आरोपींना अटक केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24