अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : श्रीरामपूरमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कोविड १९ साठी येथील तत्काळ निदान तपासणी शिबीरात ७८ जणांच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या.
त्यामध्ये तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही याठिकाणीच तत्काळ तपासणी करण्यात आली. त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने येथील वार्ड क्र. ७मध्ये सोशल क्लबच्या सभागृहात तत्काळ तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबीरात सहा आरोग्य कर्मचारी व दहा आशा सेविकांनी शिबीराला उपस्थित असलेल्या व्यक्तींची तपासणी केली.
यावेळी नॉद्रर्न ब्रॅच ते सरस्वती कॉलनीपर्यंतच्या व्यक्तींनी हजेरी लावली. यातील ७८ व्यक्तींची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यात तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews