अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कारागृहातून पळालेल्या 5 पैकी 3 आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन कुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मोहन भोरे खुनातील आरोपी, गंगाधर जगताप हा अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी, ज्ञानेश्वर कोल्हे हा बेकायदा शश्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे.
अक्षय राऊत आणि चंद्रकांत राऊत हे दोघेही अद्यापही पसार आहे.
दरम्यान हे आरोपी ९ फेब्रुवारी रोजी कारागृहातून पळाले होते. फरार आरोपींपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच इतरांचा शोध सुरु आहे.