अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- राज्य शासनाच्या गाईडलाईन्स नूसार ओझर विमानतळावर परराज्यातून येणार्या. प्रवाशांना करोना चाचणी रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक आहे. मागील पाच दिवसात ओझर विमानतळावर ४८४ प्रवासी उतरले. त्यापैकी ३७३ प्रवाशांकडे करोना चाचणी केल्याचे सर्टिफिकेट होते.
तर, १११ प्रवाशांकडे सर्टिफिकेट नसल्याने त्यांची विमानतळावरच करोना चाचणी करण्यात आली. त्यात तीन प्रवाशी करोना पॉझिटिव्ह आढळले. हे तिन्ही प्रवाशी मुळचे नाशिकचे असून दोन जण अहमदाबाद तर एकजण दिल्लीहून नाशिकला परतला होता. या तिघांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती दिंडोरीचे आरोग्य अधिकारी डॉ. सुजीत किशिरे यांनी दिली. दिवाळीनंतर करोनाच्या दुस-याय लाटेचा धोका वाढला आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राजस्थान, गुजरात, दिल्ली व गोवा या राज्यातून महाराष्ट्रात येणार्या. प्रवाशांना करोना चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे. विमानतळ, रेल्वे व रस्ते मार्गाने दाखल होणार्या राज्याच्या सीमेवर चेक पाईंट उभारण्यात आले आहे. ओझर विमानतळावरुन दिल्ली व अहमदाबाद या शहरांसाठी स्पाईस जेट, अलायन्स व ट्रु विमान कंपनीद्वारे हवाई सेवा सुरु आहे. मागील २५ नोव्हेंबरपासून ओझर विमातळावर उतरणार्याअ प्रवाशांना सोबत करोना चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक आहे.
मागील पाच दिवसात ४८४ प्रवाशी ओझर विमानतळावर उतरले. त्यापैकि ३७३ प्रवाशांकडे करोना चाचणी निगेटिव्हचा अहवाल होता. तर १११ प्रवाशांकडे करोना चाचणी केल्याचा रिपोर्ट नव्हता. या प्रवाशांना विमानतळावर करोना चाचणिची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यापैकी तिन प्रवाशी करोना पॉझिटिव्ह आढळले. महापालिकेला ही माहिती कळवून पॉझिटिव्ह प्रवाशांचे तत्काळ विलगीकरण करण्यात आले.
राज्यशासनाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून विमानतळावरच करोनाची नाकेबंदी केली जात आहे. विमानतळावरच टेस्टिंगची सुविधा राज्य शासनाच्या गाईडलाईन्सनूसार महाराष्ट्रात प्रवेश करण्यापुर्वी ७२ तास अगोदर करोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. मात्र ओझर विमानतळावर उतरल्यावर अनेक प्रवाशांकडे करोना टेस्ट रिपोर्ट नसल्याचे समोर आले. ते बघता जिल्हा प्रशासनाने विमानतळावर मविप्रच्या डॉ.पवार हॉस्पिटलकडुन या ठिकाणी करोना टेस्टची सुविधा उपलब्ध करुन दिली. प्रवाशांना स्वखर्चाने ही टेस्ट करावी लागते.
विमानतळावर आलेले प्रवाशी (कंसात चाचणी न केलेले प्रवाशी)
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved