अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- टिकटॉक स्टार ‘समीर गायकवाड’या तरुणाने रविवारी (दि. २१) सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. समीरचे वय २२ वर्ष होते. दरम्यान, समीरने हे पाऊल प्रेम संबंधातून उचलेले असल्याचे बोलले जात आहे.
वाघोली परिसरातील निकासा सोसायटी येथील राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन समीर गायकवाडने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
इन्स्टाग्रामवर समीर हा एका नावाजलेला चेहरा म्हणून मागील महिन्याभरामध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. समीरने अल्पवाधीमध्ये व्हिडीओंच्या माध्यमातून तरुणाईला आवडणाऱ्या स्टाइलमध्ये वैचारिक संदेश देण्याच्या कलेमुळे अफाट लोकप्रियता मिळवलेली. समीरच्या मृत्यूसंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर इन्सटाग्रामवरील त्याच्या चाह्त्यांना या बातमीवर विश्वासच बसला नाही.
त्याच्या घरात त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही.त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. तो म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवायचा.
टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, सोशल मीडीयावर समीरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे शहरासह राज्यभरातील चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.