सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोककलावंत ‘तमाशा पंढरीमध्ये’ करणार ‘असे’ काही….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत. या परिस्थतीमुळे अनेक क्षेत्रे बंद आहेत.

यात तमाशासारखे लोककला देखील बंद आहेत. त्यामुळे या लोककलावंतांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अशात राज्य सरकारने कसलीही मदत केली नसल्याने,

याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या दि. 21 सप्टेंबर रोजी तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नारायणगाव येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय लोककलावंतानी घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण होणार आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रातील लोककलावंतांचा यावर्षीचा हंगाम निघून गेल्याने आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहिले नाही.

चालू वर्षी सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्याने कोणी कार्यक्रमाला बोलावीत नाही.अशी खंत ह्या कलावंतांची आहे.

म्हणूनच यापूर्वी राज्यातील विविध संघटनेनी निवेदनाव्दारे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणी केली होती.

परंतु अद्यापही सरकार जागे झाले नाही. त्यामुळे लोक कलावंतांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24