जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नगर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे नव्या अध्यक्षपदाची सोडत मंगळवारी (१९ नोव्हेंबर) होणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष लागले आहे.

२००१ पासून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीसाठी एकदा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकदा, याच प्रवर्ग महिलासाठी एकदा व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी एकदा असे आरक्षण पडले होते. तीन वेळा अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी होती.

आता अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता ग्रामविकास मंत्रालयात लकी ड्राॅ पध्दतीने अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.

जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. अध्यक्षपद काँग्रेसच्या शालिनी विखे यांच्याकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे आहे. सध्याच्या अध्यक्ष विखे काँग्रेसच्याच अध्यक्ष असल्या, तरी त्यांचे पुत्र हे भाजपचे खासदार व पती भाजपचे आमदार आहेत.

राजश्री घुले या राष्ट्रवादीच्या आहेत. जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सदस्य संख्या सर्वाधिक आहे. मात्र, बदलेली राजकीय परिस्थिती पाहता अध्यक्षपद कुठल्याही प्रवर्गासाठी राखीव झाले, तरी आपल्याच गटाचा अध्यक्ष करण्याचा विखेंचा प्रयत्न आहे.

काँग्रेसची सदस्य संख्या जास्त असली, तरी काँग्रेसमधीलच काही सदस्य हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे आहेत. थोरात गटाचीदेखील भूमिका यात महत्त्वाची असणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २३, राष्ट्रवादी १९, भाजप १४ शिवसेना ७, क्रांतिकारी संघटना ५, भाकप १, अपक्ष ४ असे ७३ चे संख्याबळ आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24