दहा रुपयांची तंबाखू पुडी झाली पंचवीस रुपयांना !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- कर्करोगाचा धोका असला, तरी तंबाखूला मोठी मागणी आहे. लाॅकडाऊनमुळे टपऱ्या बंद आहेत.

तंबाखूचे दर ठोक बाजारात वाढवण्यात आल्याचे कारण पुढे करत सध्या चढ्या दराने पुडीची किरकोळ विक्री सुरू आहे.

तंबाखू सर्व पानटपऱ्या, तसेच किरकोळ किराणा दुकानात सहज मिळते.

मात्र, कोरोना लाॅकडाऊनमुळे केवळ जीवनावश्यक साहित्य, तसेच आरोग्य सेवा मिळवण्याचीच मुभा आहे.

मागील पंधरा दिवसांपासून किराणा दुकानातील तंबाखूचा साठा संपला आहे. त्यामुळे काळाबाजार सुरू झाला आहे.

घाऊक बाजारात ३५० ते ४०० रूपयांचा पुडा आता ८०० ते ९०० रूपयांना विकला जातो.

पुडीची खरेदीच २० रूपये झाल्याने किरकोळ विक्री २५ ने केली जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24