अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्या घरावर ईडीनं पहाटे ईडी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई ईडीकडूनन करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
ईडीचे अधिकारी यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले असून सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयाच चौकशी सुरु आहेत.
ईडीचे अधिकारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. ईडीनं सकाळ सकाळी केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोपा मलिकांच्या समर्थकांनी केला आहे. नवाब मलिकांचे कार्यकर्ते आता मोठ्या संख्येनं ईडी कार्यालयाबाहेर पोहोचून त्यांना समर्थन देणार असल्याचं सांगितलं जातंय.