डोंगरगण परिसरात मुसळधार ; पिके पाण्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल अहमदनगर तालुक्यातील डोंगरगण येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिसरात जोरदार पाऊस पडला. काल झालेल्या पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. पिके पाण्याखाली गेले आहेत.

त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन मदत मिळण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली.

मका, कपाशी, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले.

तर कुठे उभे पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. सद्यपरिस्थितीत शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केलेली आहे.

परंतु सततच्या जोरदार पावसाने कांदा पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. कांद्याच्या पिकात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले आहे. कांदा पिकांवर सड, बुरशी, पिळकावण्या, हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.

कांदा पिकाची वाढ खुंटलेली आहे. परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसाने सर्वच पिकांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24