अहमदनगर :- श्रीगोंदा तालुका प्रशासनाने 11 एप्रिल ते दि 13 एप्रिल 2020 असे 3 दिवस जनता कर्फ्यु संपूर्ण तालुक्यात जाहीर केला आहे.
उद्यापासून (दि. 11) सलग तीन दिवस तालुका बंद करणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे.
या कालावधीत तालुक्यात फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल आणि हॉस्पिटल, खाजगी दवाखाने सुरू राहतील.
व पेट्रोल, डिझेल अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहतील.
अन्य अत्यावश्यक सेवा जसे किराणा, भाजीपाला, दूध, गॅस हे फक्त घरपोच सेवा देणे नेहमीप्रमाणे सुरू राहील.
या कालावधीत कोणीही नागरिक अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाहीत याची सर्वानी दक्षता घ्यावी,
अन्यथा त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई साठी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®