महाराष्ट्र

Tourist Village: महाराष्ट्रातील ‘हे’ खेडे दोन नद्यांच्या संगमामुळे ठरते अनोखे; पावसाळ्यात या ठिकाणी जाल तर निसर्गसौंदर्याने पडेल तुम्हाला भुरळ

Published by
Ajay Patil

Tourist Village:- महाराष्ट्र म्हटला म्हणजे सगळ्यात अगोदर समोर येते ते या ठिकाणी असलेला ऐतिहासिक वारसा हा होय. या ठिकाणी असलेले समृद्ध गड किल्ले तसेच सह्याद्रीच्या कुशीत वाहणाऱ्या नद्या तसेच धबधबे, वळणवळणांची घाट रस्ते आणि पावसाळ्यात हिरवाईची चादर पांघरलेली  दरे-खोरे अशा प्रकारचे चित्र साधारणपणे आपल्यासमोर उभे राहते.

महाराष्ट्राला विपुल नैसर्गिक संपदा लाभलेली आहे व ती प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रात निसर्गाने भरभरून दिलेली आहे व निसर्गाच्या या खूणांचे अनेक आगळे वेगळे आणि नैसर्गिक दृश्य आपल्याला अनेक गावागावांमध्ये देखील दिसून येते.महाराष्ट्र मध्ये ज्याप्रमाणे निसर्गांची लय लूट आपल्याला दिसून येते

अगदी त्याचप्रमाणे आपल्याला काही महाराष्ट्रातील गावांमध्ये देखील निसर्गाच्या कृपेमुळे एक वेगळे सौंदर्य आपल्याला बघायला मिळते. अगदी महाराष्ट्रातील खेडेगावांचा विचार केला तर यामध्ये माहूली या गावाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. हे एक अनोखे गाव असून या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम होतो व या संगमावरच हे गाव वसले असून या दोन्ही नद्यांमुळे या गावाचे दोन विभाग झालेले आहेत.

माहुली आहे महाराष्ट्रातील अनोखे गाव

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कृष्णा आणि वेण्णा या दोन महत्त्वाच्या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले असून या दोन नद्यांच्या संगमामुळे या गावाचे दोन भाग पडलेले आहेत. यातील एका भागाला संगम माहुली आणि दुसऱ्या भागाला क्षेत्र माहुली असे म्हटले जाते. तसेच या गावाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाला ऐतिहासिक स्थळाचा वारसा देखील लाभलेला आहे व तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्या समाधी देखील संगम माहुली या ठिकाणी बघायला मिळतात.

तसेच या ठिकाणी देव कोष्टक असून या कोष्टकाच्या डाव्या साईडला गणपती आणि उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती देखील तुम्हाला पाहायला मिळतात. देव कोष्टकाच्या सभा मंडपामध्ये एक मोठी घंटा असून या मुख्य मंदिरावर विटांची शिखर करण्यात आलेले आहे व त्याला चुन्याचा गिलावा केलेला असल्यामुळे ते खूप सुंदर दिसते.

तसेच या शिखराला अनेक देवकोष्टके असून मंदिरासमोर नंदीमंडप आहे व त्यावर अष्टकोनी शिखर आहे. तारकाकृती असणाऱ्या या मंदिराचा गर्भगृह तसेच सभामंडप व अंतराळ अशी रचना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी असलेल्या अंतराळ हे चार स्तंभांवर आधारित असून यातील दोन अर्धस्तंभ आहेत तर दोन पूर्ण आहेत. मंदिराचा सभामंडप तुम्हाला तिन्ही बाजूने मोकळा पाहायला मिळतो.

 संगम माहुली येथे आहे 400 वर्षे जुने विश्वेश्वराचे मंदिर

तसेच संगम माहुली या ठिकाणी 400 वर्ष जुनं विश्वेश्वराच्या मंदिर असून हे वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर व या दोन्ही नद्यांच्या संगमस्थानावर आहे. महत्त्वाचे  म्हणजे संगम माहूलीला दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून देखील ओळखले जाते.

या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण राज्यातून अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक विधी तसेच अस्थी विसर्जनासाठी येताना आपल्याला दिसून येतात. तुम्हाला जर संगम माहुली या ठिकाणी जायचे असेल तर हे गाव साताऱ्यापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. तसेच संगम माहुली या ठिकाणचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 400 वर्षे जुने एक प्राचीन मंदिर देखील तुम्हाला पाहायला मिळते.

Ajay Patil