महाराष्ट्र

Maharashtra Tourism : सह्याद्रीच्या कुशीत लपलेला १०० ते १५० फुटावरून कोसळणारा धबधबा पाहायला पर्यटकांची पसंती !

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Tourism : मुळशी तालुक्यातील लवासापासून जवळच्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंग्या घाट धबधब्यावर पर्यटकांची रविवारी (दि ३०) खूप गर्दी झालेली पाहायला मिळाली. लिंग्या घाटातील धबधब्याला पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

लिंग्या घाट धबधबा

गेल्यावर्षी पासून पाऊस चालू झाला आणि लिंग्या घाट धबधबा चालू झाला की शनिवार व रविवारी खूप पर्यटक लिंग्या घाट धबधबा पाहायला येत आहेत. यावर्षी तर खूपच पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली आहे. पण, सध्या चालू असलेल्या पावसाच्या पाश्र्श्वभूमीवर प्रत्येक पर्यटकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

एका दगडाचा आकार सुळक्या सारखा झालाय त्या सुळक्यालाच लिम्या घाट नाव पडले आहे. पुराणिक काव्यापासून बऱ्याच पाय वाटा मावळातून कोकणात उतरतात. त्यापैकी ही एक ऐतिहासिक काळातील पायवाट कोकणात जिते, उंबडी, माणगाव तालुक्यातील गावांना भेटते. तसेच एक वाट कुई गड म्हणजेच विश्राम गडाकडे जाते.

पुण्यातून लवासा सिटी येथे आल्यानंतर पुढे भोईणी मूगाव- कोळोशी, तसेच शेवटचे धामण ओहोळ गाव कोकण किनारपट्टीला लागून आहे आणि त्याच किनारपट्टीला लिंग्या घाट धबधबा आहे, त्या ठिकाणी धुकं व भरपूर पाऊस पडत आहे.

हिरवी गार चादर पसरलेले डोंगर, कडे पाहायला मिळतात. या परिसरात काही ठिकाणी नेटवर्क नसल्याने व माहिती फलक नसल्याने लिग्या घाट धबधब्यावर जात असताना पर्यटकांना अडथळा येत आहे.”

तसेच अनेक पायवाटा असल्याने पर्यटक पायवाटा चुकू शकतात. त्यामुळे धामणओहोळ गावातील नागरिकांची पर्यटकांनी मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office