Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Toyota Fortuner 2023 : MG Gloster ला टक्कर देण्यासाठी येतेय नवीन शक्तिशाली कार, दमदार फीचर्स पाहून व्हाल वेडे…

Toyota Fortuner 2023 : भारतीय कार बाजारात दररोज नवनवीन गाड्या लॉन्च होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त लोकांना पसंत पडलेली कार म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या कारला देशात खूप पसंती मिळत आहे. आता कंपनी लवकरच या कारचा नवीन अवतार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच या कारमध्ये तुम्हाला जबरदस्त पॉवरट्रेनसह जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. यासोबतच कंपनी या कारमध्ये उत्कृष्ट सुरक्षा फीचर्स देखील देऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, कंपनीची ही कार एमजी ग्लोस्टरलाही थेट टक्कर देऊ शकेल.

टोयोटा फॉर्च्युनर 2023 सुरक्षा फीचर्स

नवीन टोयोटा फॉर्च्युनरमध्ये कंपनी अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम देऊ शकते. यासोबतच क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट, लेन डिपार्चर, व्हेइकल स्टॅबिलिटी कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, इलेक्ट्रिक स्टीयरिंग व्हील आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यासारखे धन्सू सेफ्टी फीचर्स यात दिले जाऊ शकतात.

टोयोटा फॉर्च्युनर 2023 पॉवरट्रेन

कंपनी या कारमध्ये एक मजबूत पॉवरट्रेन देखील देऊ शकते. यामध्ये कंपनी नवीन टॅकोमा पिकअपसह 2.4 लीटर 4 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देऊ शकते. त्यात हायब्रीड तंत्रज्ञान पॉवरट्रेन देण्यात येणार आहे.

टोयोटा फॉर्च्युनर 2023 किंमत

सध्या कंपनीने या कारच्या किमतींबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु असे मानले जात आहे की कंपनी याला जवळपास 35 ते 45 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात आणू शकते. तसेच या कारचा लूक देखील खूपच मस्त असणार आहे. यामध्ये कंपनी हायटेक तंत्राचा वापर करणार आहे.