Tractor Subsidy Scheme : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आता ट्रॅक्टर घेण्यासाठी सरकार देणार तीन लाख रुपये अनुदान, फक्त करा एक अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor Subsidy Scheme : जर तुम्ही शेतकरी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून शेती मधील कामे अधिक सोप्प्या पद्धतीने होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणत आहे.

यासाठी शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्र खरेदीसाठी अनुदान देत आहे. शेती करण्यासाठी सर्वात महत्वाचे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने जवळपास आपल्या शेतीतील सर्वच कामे केली जातात.

पण ट्रॅक्टर ची किंमत अधिक असल्याने सर्वच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने ट्रॅक्टर खरेदीवर तीन लाख रुपये अनुदान दिले आहे.

हे जवळपास सर्वच राज्यांमध्ये ट्रॅक्टर खरेदीवर साठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी त्या त्या राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहेत. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार किती अनुदान देणार-

प्रत्येक राज्यातून अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांकडून अर्ज मागण्यात आले आहेत. अनुसूचित जाती मधील असणाऱ्या शेतकऱ्यांना 2022-23 या वर्षासाठी ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान कृषी आणि शेतकरी कल्याण या विभागमार्फत देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना 35 HP पेक्षा जास्त ताकद असणाऱ्या ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार तीन लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी सुमारे 30 ट्रॅक्टर खरेदी साठी अनुदान देण्यात येणार आहे. या तीस ट्रॅक्टर साठी सरकारकडून 90 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या प्रकारे हरियाणा राज्याने 22 जिल्ह्यासाठी जवळपास या योजनेतून 1980 लाख रुपये मंजूर केले आहेत.

अटी जाणून घ्या

या योजनेमध्ये शासनाने ठेवलेल्या उदिष्ट पेक्षा जर जास्त अर्ज आले तर कार्यकारी समिती ही लाभार्थ्यांची निवड करेल.
जे शेतकरी लाभार्थी असतील त्यांच्या नावाने ट्रॅक्टर ची नोंदणी असने गरजेचे असते.
तसेच पुढील येणाऱ्या पाच वर्षापर्यंत ट्रॅक्टर न विकण्यासाठी चे प्रतिज्ञा पत्र लाभार्थ्याला द्यावे लागते. जर शेतकऱ्याने पाच वर्ष मुदत पूर्ण होण्याअगोदर ट्रॅक्टर विकला तर अनुदानाची पूर्ण रक्कम ही त्या शेतकऱ्यांकडून शासन वसूल करते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला ‘मेरी फसल मेरा ब्योरा’ या संकेस्थळावरील नोंदणी करणे आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त काही कागदपत्र देखील अपलोड करणे गरजेचे आहे, ती पुढे दिली आहेत.

आवश्यक कागदपत्रे

रेशनकार्ड
आधारकार्ड (मोबाईल नंबर लिंक असावा)
मोबाईल नंबरशेतीचा सातबारा उतारा
पासबुक झेरॉक्स
पॅन कार्ड

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज

शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने करावा. तसेच तुम्ही कृषी कल्याण विभागात जाऊन याबद्दल माहिती घेऊ शकता. तसेच आपण आपल्या जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांशी देखील संपर्क करून अर्ज कसा भरायचा याबद्दल माहिती घेऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून निवडलेले लाभार्थी हे कुठल्याही कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.