Railway News : मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड-मनमाड मार्गावरील बेलापूर ते पढेगाव स्थानकादरम्यान दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने २० जुलैपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द केल्या असून,
इतर गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या कामामुळे १९ ते २० जुलैदरम्यान दौंड- निजामाबाद, निजामाबाद- दौंड तसेच पुणे-भुसावळ डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय १८ व १९ जुलै या दिवशी बंगळुरू-नवी दिल्ली एक्स्प्रेस ही गाडी दौंड,
पुणे लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे धावणार आहे. हजरत निझामुद्दीन वास्को एक्स्प्रेस ही व्हाया मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे मार्गे धावेल, असे प्रशासनाने म्हटले आहे. यशवंतपूर हजरत निझामुद्दीन संपर्कक्रांती तसेच लखनौ-पुणे या गाड्या लोणावळा,
कर्जत, पनवेल व मनमाड मार्गे धावतील. यशवंतपूर चंडीगड एक्स्प्रेस लोणावळा, वसई रोड, वडोदरा, रतलाम मार्गे धावणार आहे. पुणे-जबलपूर एक्स्प्रेस व पुणे-हटिया एक्स्प्रेस, पुणे- गोरखपूर एक्स्प्रेस, पुणे-लखनौ एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.