दुर्दैवी घटना : जखमी झालेल्या बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- अपघातात जखमी झालेल्या बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून औरंगाबादकडे जाणाऱ्या भावाला दुसऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला.

या अपघातात अन्य दोघे जण जखमी झाले असून हा अपघात शुक्रवारी साडेनऊ वाजता राक्षसभुवन फाट्यावर घडला. गेवराई तालुक्यातील रांजणी येथील

शिवराज बालासाहेब सावंत (१९) यांची चुलत बहिण दीक्षा उमेश पवार (रा.राजंणी, ता.गेवराई) हिचा सात दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील तलवडा- गेवराई महामार्गावर पिकअपचा अपघात झाला होता.

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती सध्या गंभीर आहे.

बहिणीला भेटण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी रांजणी येथून शिवराज सावंत यांच्यासह योगेश सावंत व विजय सावंत हे तिघे जण औरंगाबादला निघाले होते.

रात्री साडेनऊ वाजता राक्षसभुवन फाट्यावर त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या समोरून येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात शिवराज बालासाहेब सावंत हा जागीच ठार झाला

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24