अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- यापुर्वीच वनविभगाने दोन बिबटे जंरबंद करूनही परत पाथउर्ी तालुक्यातील मोहरी परिसरात बिबट्या व दोन बछड्यांना नागरिकांनी पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
बुधवारी रात्री १ बिबट्याची मादी व दोन बछडे नागरिकांना दिसले. रात्रीची वेळ असल्याने वनविभागाचे कर्मचारी येऊनही आम्ही काही करू शकत नाहीत,असे सांगितल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.
नरोटे वस्तीवरील एका म्हशीवर हल्ला केल्याने ती जखमी झाली. बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी मोहरीकर आंदोलनाच्या तयारीत आहेत.
बुधवारी रात्रीच्या वेळी सात वाजण्याच्या सुमारास सुनील बन यांच्या घराच्या पाठीमागे शंभर मीटरवर असलेल्या नाल्याच्या भिंतीलगत बिबट्याची मादी व दोन बछडे नागरिकांनी पाहिले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली.
वनकर्मचारी आले. मात्र, अंधार असल्याने आम्ही काही करू शकत नाहीत,असे सांगितले. रात्रभर वस्तीवरील लोक जागे होते. येथे वनविभागाने पिंजरा लावलेला असूनही बिबट्याची मादी त्याकडे फिरकत नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved