Uttan To Virar New Link Road:- मुंबई म्हटले म्हणजे त्या ठिकाणाची वाहतूक कोंडी व काही किलोमीटर प्रवास करायला लागणारा तासनतास वेळ हा आपल्या डोळ्यासमोर पटकन येतो. मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात ट्राफिक असते व तुम्हाला पाच ते दहा किलोमीटरचा जरी प्रवास करायचा असेल तरी एक ते दोन तास देखील लागू शकतात.
त्यामुळे मुंबई शहरामध्ये आता ट्रॅफिक कोंडी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून व प्रवास जलद व्हावा म्हणून अनेक प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. यामध्ये आपल्याला कोस्टल रोडचे उदाहरण घेता येईल. अनेक प्रकल्पांचे कामे सध्या मुंबईत सुरू असल्यामुळे येणाऱ्या काही दिवसात मुंबईतील ट्राफिक कोंडीची समस्या बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होईल.
अगदी याच पद्धतीने जर आपण भाईंदर म्हणजेच उत्तन ते विरार दरम्यान तयार केल्या जात असलेल्या 55 किलोमीटर लांबीचा नव्या लिंक रोडच्या बद्दल बघितले तर हा देखील आता खूप फायद्याचा लिंक रोड ठरणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या नव्या लिंक रोडचा आराखडा तयार केला असून या एकूण 55 किलोमीटर मध्ये 24 किलोमीटरचा भाग हा सागरी मार्ग असणार आहे तर हा लिंक रोड 19.1 मीटर रुंद आणि पाच लेनचा असेल व अशा पद्धतीचा आराखडा सरकारकडे मंजुरी करिता पाठवला जाणार आहे.
वर्सोवा ते विरार हा प्रवास होणार 45 मिनिटात
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उत्तन( भाईंदर ) ते विरार दरम्यान ५५ किलोमीटर लांबीचा नवीन लिंक रोडचा आराखडा तयार केला असून हा 55 किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी 24 किलोमीटरचा रस्ता हा सागरी मार्ग असणार आहे.
या रस्त्याचा आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असून विशेष म्हणजे हा नवीन लिंक रोड कोस्टल रोडला जोडला जाईल व कोस्टल रोड वर्सोवा ते भाईंदर दरम्यान सध्या बनवला जात आहे व त्यामुळे नक्कीच या परिसरातील प्रवाशांना खूप मोठा फायदा होईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार बघितले तर हा 55 किलोमीटर लांबीच्या नव्या रोडचा संपूर्ण डीपीआर तयार करण्यात आला आहे व या डीपीआरचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे.
त्यानंतर हा डीपीआर सरकारकडे मंजुरी करिता पाठवला जाईल. हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा असून तो कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी देणार आहे. त्यामुळे कोस्टल रोड आणि उत्तन ते विरार या नव्या लिंक रोड मुळे वर्सोवा ते विरार हा प्रवास फक्त 45 मिनिटात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
सध्या जर आपण बघितलं तर वसई वरून जर मुंबईला यायचे असेल तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि लोकल ट्रेन हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते.
परंतु या नव्या लिंक रोड मुळे नागरिकांना होणाऱ्या या वाहतूक कोंडी पासून नक्कीच दिलासा मिळेल. तसेच या 55 किलोमीटर लांबीच्या नव्या लिंक रोडला वसई, उत्तन आणि विरार या ठिकाणी कनेक्टर तयार केले जाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात या लिंक रोडमुळे नक्कीच वसई ते विरार प्रवास करताना खूप मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.