‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्रिचे लग्न संपन्न; लग्नात होते उपस्थित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-तुला पाहते रे फेम अभिज्ञा भावेने लग्न केले आहे. काय,कानांवर विश्वास नाही बसला. तर बातमी खरी आहे. अभिज्ञा भावे नुकतीच मेहुल पै सोबत लग्नबंधनात अडकली आहे.

त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.त्या फोटोंमध्ये अभिज्ञा भावेने आणि राहुल पै या दोघांनी गुलाबी रंगाचे आऊटफिट घातलेले दिसून आले.

सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर दिसून आले. अभिज्ञा भावाचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अभिज्ञा भावेचे लग्न नुकतेच मेहुल पैसोबत झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर दिसून आले. यापूर्वी त्यांच्या मेहनादी कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ दिसून आले होते.

त्याला मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती . ऑक्टोबर मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. अभिज्ञान साखरपुड्याच्या वेळीच व्हिडीओ टाकताना माझा साखर कारखाना असे कॅप्शन दिले होते.

अभिज्ञाचा पती मेहुल पै मूळचा मुंबईचा आहे. तो इव्हेन्ट मॅनेजमेंट,टाइम मॅनेजमेंट,फायनान्सियल प्लॅनिंगची जबाबदारी सांभाळतो.

तो एका कंपनीत ऑपरेशन मॅनेजर आहे. तिथे तो जवळपास १२ वर्षांपासून असून क्लॉकवर्क्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कार्यरत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24