बावीस वर्षीय नातीचा आणि आजोबाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील बावीस वर्षीय नातीचा आणि आजोबाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हर्षदा सुभाष खेडकर वय २२ या युवतीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तर आजोबा नारायण खेडकर वय ९० वर्ष यांचा धुराने गुदमरून जीव गेल्याची धक्कादायक प्रकार घडला असून हि घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.

हर्षदा खेडकर हिने घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला आहे.तर नारायण खेडकर बाजूला असणाऱ्या खोलीत मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळी उडाली आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे,पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी,सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार,पोलीस हवालदार अजिनाथ बड़े,

पोलीस कॉन्स्टेबल विजय सुपेकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून भेट दिली आहे. दोन्ही मृतदेह पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता

डॉक्टरांनी या मृत्यू बाबत ९० वर्षीय इसमाचा धुराने गुदमरून व युवतीचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24