डंपर चोरणाऱ्या दोघांना अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर : तालुक्याच्या पिंपळे शिवारातील शिवशक्ती स्टोन क्रेशर येथून दोन जण डंपर चोरून नेत असताना मालदाड शिवारात पोलिसांनी पकडल्याची घटना शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे.

 

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील पिंपळे शिवारात बाबासाहेब विठ्ठल चकोर यांचे शिवशक्ती स्टोन क्रेशर येथून शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सचिन पोपट खालकर (रा. पारेगाव, ता. संगमनेर) व बाळासाहेब पांडुरंग सहाणे (रा. चास नळवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) या दोघांनी मिळून दहा लाख रुपये किंमतीचा डंपर (क्र. एमएच ०६ एक्यू ०५७३) चोरून नेला.

 

याबाबत पोलीस कंट्रोल रुमच्या वतीने रात्रीच्या वेळी गस्त घालणारे तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी, ओंकार शेंगाळ, अण्णासाहेब दातीर यांना ही माहिती समजली. त्यामुळे त्यांनी डंपरचा पाठलाग केला व डंपरसह सचिन खालकर व बाळासाहेब सहाणे या दोघांना मालदाड शिवारात पकडले.

याप्रकरणी अनुभव जितेंद्र सिंग (रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी सचिन पोपट खालकर व बाळासाहेब पांडुरंग सहाणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24