भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन भावांचा मृत्यू!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोला : वाडेगाव शेतशिवारात हरभरा आणि गहू पिकाला पाणी देण्यासाठी रविवारी सकाळी आरिफ खान गेले होते. मोटरपंप चालू करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. विजेचा धक्का बसताच त्यांनी जीवाच्या आकांताने मदतीसाठी जवळच असलेल्या भावाला आवाज देण्याचा दिला.

आरिफ खानचा आवाज ऐकताच भाऊ शेख आसिफ शेख शब्बीर (३२), शेख मेहमूद शेख राशीद (४५) हे धावत त्यांच्याजवळ गेले. यादरम्यान आरिफला वाचवण्यात दोघांना यश आले; पण दोघांनाही विजेचा जोरदार धक्का लागला.

त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विजेच्या धक्क्यात गंभीर जखमी असलेल्या आरिफला उपचारासाठी सर्वोपचार सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24