एकाच दिवशी दोन जणांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी :- तालुक्यातील वांबोरी व वरवंडी या दोन ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. वांबोरी येथील घटना नाजुक प्रकरणातुन घडली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

याबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून राहुरी पोलिस पुढील तपास करीत आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे प्रमोद गोरक्षनाथ भोसले, वय वर्षे २२, रा. ससे गांधले वस्ती, वांबोरी हा कॉलेज तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता होता.

आज दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी वांबोरी परिसरातील गणपती घाट येथील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वांबोरी पोलिस ठाण्यातील हवालदार शैलेश सरोदे, अशोक तुपे आदि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

 तसेच दुसरी घटना राहूरी तालुक्यातील वरवंडी येथील बाळासाहेब लहानू जाधव या ३८ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. बाळासाहेब जाधव हे १० डिसेंबरच्या रात्री आपल्या घरात एकटेच झोपले होते.

सकाळी ऊशीरापर्यंत त्यांनी घराचे दार उघडले नाही. म्हणून शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समजले.

या घटनेचा तपास एस. एस. कारेगावकर हे करीत आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी व वरवंडी या दोन ठिकाणी घडलेल्या आत्महत्याचे कारण अद्याप समजले नसून याबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24